Share

Salman Khan | मेहुण्यानंतर सलमान खानची भाची करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

मुंबई: बॉलीवूडचा दबंग (Dabangg) सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या बिग बॉस (Big Boss) मुळे चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये सलमान खानच्या होस्टिंगला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळत आहे. सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. अशा परिस्थितीत सलमान खानचे दोन चित्रपट सध्या चर्चेत आहे. सलमान खान इतर अनेक कलाकारांना चित्रपटाच्या माध्यमातून संधी देत असतो. तर दुसरीकडे बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला संधी देण्यावरून टीका होत असतात. अशा परिस्थितीत सलमान खान लवकरच त्याच्या भाचीला चित्रपट सृष्टीमध्ये घेऊन येणार आहे.

स्टार किड्सना बॉलीवूडमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं जातं यावरून अनेक निर्माते, दिग्दर्शक यांना ट्रोल केले जाते. अशात आता सलमान खान त्याच्या भाचीला बॉलीवूडमध्ये दाखल करणार आहे. सलमान खानची भाजी अलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) ने तिच्या डेब्यू फिल्मचे चित्रीकरण सुरू केले आहे. अलिझेह अनेक पुरस्कार विजेते सौमित्र पाधी यांच्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलिझेह ही सलमानची बहीण अल्विरा अग्निहोत्री ची मुलगी आहे.

अलिझेहच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत तिचे वडील अतुल अग्निहोत्री 2019 मध्ये एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, “याबद्दल आता बोलणे खूप घाईचे होईल. पण एक वडील म्हणून माझी अशी इच्छा आहे की तिने चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याची तयारी आधी स्वतःच करावी. तिने चित्रपटांमध्ये काम करताना कामासोबत मजा देखील करावी. माझ्या मुलांनी चित्रपट व्यवसायातील चढ-उतार पाहिले आहे. त्यामुळे ते हे नक्कीच लक्षात ठेवतील.”

अलिझेह अग्निहोत्री ही सलमान खानची बहीण अल्विरा अग्निहोत्री ची मुलगी आहे. अलिझेह ही 22 वर्षाची असून ती सलमान खानबरोबर अनेकवेळा दिसली आहे. अलिझेह सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र यासाठी तिच्या वडिलांनी नकार दिला होता. पण आता अलिझेह लवकरच चित्रपटसृष्टीमध्ये दाखल होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: बॉलीवूडचा दबंग (Dabangg) सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या बिग बॉस (Big Boss) मुळे चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये सलमान …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now