सलमान खान ‘टायगर ३’ सिनेमासाठी घेतोयं प्रचंड मेहनत; पाहा व्हिडिओ

सलमान खान

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सलमानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर सिने सृष्टीत त्याची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होत असते. सद्या ‘टायगर-३’ या सलमानच्या आगामी सिनेमामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा होत आहे. नुकतेच या चित्र पटा साठी घेत असलेली मेहनत एका व्हिडिओद्वारे समोर आली आहे.

नुकताच सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या तो जीममध्ये वर्कआउट करताना दिसतोय. हा व्हिडीओत  शेअर करत त्याने लिहिले की, ‘मला वाटतंय ही व्यक्ती ‘टायगर ३’ साठी ट्रेनिंग घेत आहे.’शिवाय या व्हिडीओत ‘टायगर जिंदा है’चं म्युझिक ऐकू येत आहे. सलमानची मेहनत पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

‘टायगर ३’ या सिनेमात पुन्हा एकदा सलमान खान एजंट अविनाश सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा जोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय सलमान खानसोबत अभिनेता इमरान हाश्मीइची देखील विशेष भूमिका असणार आहे. सलमानच्या या चित्रपटासाठी त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड उत्सुक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP