सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली

टीम महाराष्ट्र देशा : उमंग या सोनी टी व्ही च्या नव्या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच लौंच करण्यात आला आहे . या प्रोमोत सलमान आणि कतरिना कैफला कपिल शर्मा स्टेजवर बोलवताना दिसतो आहे.

सलमान खानला स्टेजवर आल्यावर कपिल त्याला विचारतो की, सोशल मीडियावर मला तुमचे अनेक फॅन्स विशेषतः मुली मेसेज करून विचारतात की, तुम्ही कोणत्या मुलीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तिचा फोटो झुम करून कधी पाहिला आहे का?

या प्रश्नावर एकही सेकंदाचा विचार न करता सलमानने कतरिनाकडे पाहात उत्तर दिले की, मी कधीही कोणत्या मुलीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन असे काहीही केलेले नाहीये. हा, पण कतरिनाचे सगळेच फोटो मी झुम करून पाहातो.

यावरून एकाच अंदाज लावता येऊ शकतो कि सलमान अजूनही कतरिना कैफच्या प्रेमात आहे.सलमान खानाने नुकतेच वयाचे ५५ वर्षे पूर्ण केले आहे पण अजूनही सलमान खानने लग्न केले नाही.सलमान खानचे नाव तसे बऱ्याच अभिनेत्रीन्सोबत जोडले गेले आहे.पण कतरिना मात्र सलमान खानचे नेहमीच प्रेम राहिले आहे.