मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) सतत चर्चेत असणारं नाव आहे. त्याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडले गेले. मात्र सलमान अजूनही अविवाहित आहे. नुकतच बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीने (Somi Ali) सलमान खानसोबत असणाऱ्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे.
नुकतच सोमी अलीने एका मुलाखतीत ही माहिती दिली. या मुलाखतीदरम्यान म्हणाली, “आम्ही हिंदी चित्रपट पाहायचो आणि माझा सलमानवर खूप क्रश होता. त्या रात्री मला एक स्वप्न पडले. यानंतर मी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी फक्त १६ वर्षांची होते. माझ्या आईला सांगितले की मी सलमान खानशी लग्न करण्यासाठी मुंबईला जात आहे.” तिने सलमानसोबत एका चित्रपटाचे शूटींगही केले. मात्र काही कारणात्सव ते बंद पडले. सोमी म्हणाली, “आम्ही नेपाळला जात होतो. त्यानंतर मी त्याला म्हणाली, “तुझ्याशी लग्न करायला मी इथपर्यंत आली आहे.” “तुझ्याशी लग्न करायला मी इथपर्यंत आली आहे.” त्यावर तो म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आहे.’ त्यावर मी म्हणाली, ‘मला काही फरक पडत नाही.’
दरम्यान सोमी अलीने सलमान खान एकमेकांना डेट करत असून दोघं आठ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या मोठ्या चर्चा होत्या. मात्र आठ वर्षांनंतर ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडचा निरोप घेत परदेशात स्थायिक झाली. आता सलमान खानने तिची फसवणूक केल्याचे सोमी अली खानने म्हटले आहे. विशेष म्हणजे सोमीने सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ (‘Maine Pyaar Kiya’) हा चित्रपट पाहून त्याच्या प्रेमात पडली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानसोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन ती भारतात आली. विशेष म्हणजे ते दोघेही एकमेकांना १९९१ ते १९९९ पर्यंत डेट करत होते. सोमी अलीने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ९०च्या दशकात अनेक हिट चित्रपट ही दिले. मात्र १९९९मध्ये सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली परदेशात निघून गेली होती.
महत्वाच्या बातम्या:
- ‘विषाचे कडू घोट प्राशन करून सिंधुताईंनी अनाथांच्या आयुष्यात हसू फुलवलं’
- ‘त्या’ घटनेवरून अमरिंदर सिंग यांनी केली पंजाब मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
- भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी
- ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकरांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवेचे बीज महाराष्ट्रात रुजवले- चंद्रकांत पाटील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<