Share

Salman Khan | सलमान खान चे चाहते चिंतेत; सलमानला ‘या’ आजाराची झाली लागणं

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सुपरस्टार सलमान खान Salman Khan आपल्याला प्रत्येक वीकेंडला बिग बॉस Big Boss होस्ट करताना दिसत आहे. प्रत्येक वीकेंडला सलमान बिग बॉसच्या घरातील सदस्यांची चांगलीच वाट लावताना दिसतो. पण मात्र या वीकेंडला सलमान शो मध्ये दिसला नाही. कारण शुक्रवारी प्रदर्शित झालेला हा भाग सामान्य भागांप्रमाणे ठेवण्यात आला आहे. यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत भाईजान कुठे आहे? असे प्रश्न त्यांना उद्भवत आहे. नंतर असे सांगण्यात आले की सलमान खानला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्याचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. दरम्यान सलमानच्या चाहत्यांना दुःखद झटका बसला असून चाहते सलमानला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आहे. सलमान खान सध्या बिग बॉस बरोबरच ‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. मात्र आता डेंग्यूची लागण झाल्यामुळे अभिनेत्याला शूटिंग पासून थोडे दिवस दूर राहून आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सलमान खानचे Salman Khan शूटिंग झाले रद्द

अभिनेता सलमान खानला डेंग्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रिपोर्टनुसार, डेंग्यूमुळे सलमानला त्याच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग रद्द करावे लागत आहे. त्याचबरोबर पुढील काही आठवडे सलमान बिग बॉस मध्ये देखील दिसणार नाही अशी शक्यता देखील वर्तवल्या जात आहे. सलमानला डेंग्यू झाल्याची बातमी कळतात चाहते त्याची लवकर होण्याची प्रार्थना करताना दिसत आहे.

सलमान खान च्या जागी ‘हा’ सुपरस्टार करणार बिग बॉस होस्ट 

टेलिव्हिजन वरील लोकप्रिय शो बिग बॉस सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. विशेषता यामध्ये सलमान खानचा विकेंड वॉर चाहत्यांना बघायला खूप आवडतो. हा वीकेंड वॉरच्या आठवड्यातून दोनदा आयोजित करण्यात येतो. यामध्ये सलमान घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतो. पण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्यामुळे सलमान पुढील काही दिवस विकेटच्या वॉर मध्ये दिसणार नसून त्याच्या जागी करण जोहर शो होस्ट करणार आहे.

सलमानला डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचे सल्ला

बिग बॉस मधील सर्वांचा लाडका होस्ट सलमान खान आता काही आठवडे शोमध्ये दिसणार नाही. कारण नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बिग बॉस बरोबरच सलमान खान त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे शूटिंग करत होता. पण आता प्रकृती खराब झाल्यामुळे सलमानला काही दिवस शूटिंग पासून दूर राहून आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सुपरस्टार सलमान खान Salman Khan आपल्याला प्रत्येक वीकेंडला बिग बॉस Big Boss होस्ट करताना दिसत आहे. …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या