सलमान खानने ‘या’ कारणामुळे मागितली आथिया शेट्टीची माफी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सलमानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर सिने सृष्टीत त्याची एक खास ओळख निर्माण केली आहे. सलमान चित्रपटामध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. परंतु सोशल मिडियावर सलमान कमी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सलमान खान इन्स्टाग्रामवर केवळ 27 लोकांनाच फॉलो करतो. यातील केवळ सातच अभिनेत्रींना तो इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. यावरुन सलमानने अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टीची माफी मागितली आहे.

अभिनेता अरबाज खानने ‘पिंच या चॅट शो’मध्ये सलमानची मुलाखत घेतली होती. त्यावेळी सलमानने एक गंमतीशीर किस्सा सांगत तो म्हणाला, ‘सुनिल शेट्टीने मला तू आथियाला फॉलो करतोस का? असा प्रश्न विचारला होता. यावर मी नाही असं उत्तर दिलं. परंतु माझ्या उत्तरामुळे सुनिल काहीसा नाराज झाला. त्यामुळे मी मग आथियाची माफी मागितली. आथियाला सांग मला माफ करायला भविष्यात कदाचित मी तिला नक्की फॉलो करेन.’ असा एक किस्सा त्याने यावेळी सांगितला.

सध्या सलमानच्या ‘टायगर ३’ या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. यामध्ये पुन्हा एकदा सलमान खान एजंट अविनाश सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा जोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय सलमान खानसोबत अभिनेता इमरान हाश्मीइची देखील विशेष भूमिका असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या