सलमान खान पुन्हा संतापला, हे मनुष्याच्या वेशात असलेले सैतान…

टीम महाराष्ट्र देशा : हैद्राबादमध्ये  २६ वर्षीय पशु वैद्यकीय महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कारकराची घटना घडली. या प्रकरणात बॉलीवूडमधील कलाकारांनी  संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या  आहेत. यात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, यामी गौतम आणि आज सलमान खान यांनी सोशल मिडियावरून त्यांचा संताप व्यक्त केला.

या बलात्कार प्रकरणी बोलतांना अभिनेता सलमान खान यांनी आरोपींवर निशाणा साधला. ”हे व्यक्ती मनुष्याच्या वेशात असेलेले सैतान आहेत. या सैतानांना आपण सर्वांनी एकत्र येऊन संपवायला हव.अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच निर्भया घटना असो किवा हैद्राबाद मधील झालेल्या या  घटना भविष्यात व्हायला नको ही प्रकरणे तत्काळ थांबवणे आवश्यक आहे. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान या घटनेने पीडितेच्या  कुटुंबीयांना आपण सर्वांनी धीर दिला पाहिजे, असे सलमान यांनी ट्विट मध्ये सांगितले. तसेच  बेटी बचाव हे फक्त अभियान राहायला नको तर आपल्याला एकत्र येऊन ते आंमलात आणायला हव. शेवटी ट्विट करताना सलमान खान यांनी पीडितांच्या आत्म्याला शांती मिळो,  असे म्हणत त्यांनी पिडीत महिलेला श्रद्धांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...