सलमानला इतर सर्व अवॉर्डपेक्षा या अवॉर्डचा जास्त अभिमान वाटतो.

बाॅलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेला सलमान खान नेहमीच सर्वाना मदत करत असतो. तो त्याच्या अभिनयाबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नेहमी अग्रेसर असतो. आता पर्यत सलमान खानला अनेक पुरस्कार मिळाले पण यासर्व पुरस्कारापेक्षा सलमान खानला लंडनमधील ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्डचा जास्त अभिमान वाटत आहे .

कारण हा पुरस्कार सलमानच्या अभिनयाबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यालाही देण्यात आला आहे. दबंग अभिनेता सलमान खानला लंडनमधील ग्लोबल डायवर्सिटी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष किथ वाज यांच्या हस्ते सलमानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर वाज म्हणाले की, “ग्लोबल डायवर्सिटी पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी जगभरात वैविध्यासाठी उल्लेखनीय काम केलं असेल. सलमान खान त्यापैकीच एक असल्याने, त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.”

सलमान खानचं कौतुक करताना वाज पुढे म्हणाले की, “सलमान खान हा लोकांसाठी आदर्श आहेच. शिवाय त्याच्या बीईंग ह्यूमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी काम सुरु आहे.”

पुरस्काराबद्दल सलमान म्हणाला की, “वास्तविक, यापूर्वी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण हा पुरस्कार स्विकारताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या वडिलांनीही अशा मोठ्या पुरस्कारांनी मला गौरवलं जाईल, अशी अपेक्षा केली नव्हती.”