सलमान खान होणार लवकरच बाबा

बॉलीवूड मधला मोस्ट एलीजेबल बॅचलर म्हणजे सलमान खान. सलमान कधी लग्न करणार,कोणाशी करणार यांची नेहमीच चर्चा असते. पण आता सलमान लवकरच बाबा बनणार आहे. लग्न न करता बाबा हे थोड वेगळ वाटत ना, किवां काहीच्या मते तो एकाद्या चित्रपटात बाबाचा रोल करणार असेल अस अनेकांना वाटत असेल. पण तसे काहीच नसून सलमान सरोगसी मदरच्या मदतीने बाबा बनणार आहे.
बॉलीवूडमध्ये याआधी शाहरुख खान, आमीर खान, तुषार कपूर, करण जोहर हे सरोगसी बाबा झाले आहेत. सलमान खानच्या आई –वडिलांची अशी इच्छा आहे की सलमानने लग्न करून सेटल व्हावे. याबरोबर तो बाबा ही बनवा. यासंबधी अधिक माहिती अजूनपर्यत समोर आली नसून सलमाने देखील अजून या बातमीला दुजोरा दिलेला नाही.