सलमान आणि माझी मैत्री निरपेक्ष; मदतीची गरज लागली तर सलमानच धावून येईल- मांजरेकर

मुंबई: ‘सलमान खान माझा चांगला मित्र आहे. अनोळखी लोकांची त्याच्याबद्दल वेगळी मतं असू शकतात. पण माझ्यासाठी तो एक अफलातून माणूस आहे.’ असे मराठी कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले. बिग बॉसच्या पत्रकार परिषदेच्या वेळी महेश मांजरेकरांनी सलमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मांजरेकर म्हणाले, ‘ सलमान आणि माझी मैत्री निरपेक्ष आहे. आम्ही एकत्र कामही करत नाही. पण आज मध्यरात्री मला कोणाच्या मदतीची गरज लागली तर सलमानच धावून येईल.’

काळवीट शिकारी प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमान दोषी असल्याचा निकाल जोधपुर न्यायालयाने दिला होता, त्यानंतर त्याची रवानगी कारागुहात करण्यात आली होती. दरम्यान सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली करण्यात आल्याने जामिनावर मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता, मात्र जोशी यांच्याच समोर सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.

शुक्रवारी मध्यरात्री राजस्थानच्या न्यायालयीन यंत्रणेत मोठे खांदेपालट करत ८७ न्यायाधीशांची बदली करण्यात आली होती. यामध्ये सलमान खानला शिक्षा सुनावणारे आणि जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली. त्यामुळे सलमानला जमीन मिळणार की नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर त्याला जमीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी जोधपूर न्यायालयात सलमानच्या वकिलांसोबत त्याची बहीण अल्विरा आणि अंगरक्षक शेरादेखील उपस्थित होता.

You might also like
Comments
Loading...