‘आपल्या या कार्यक्रमाबद्दल हाचं का आदर ?’ ‘गर्ल्स’च्या पोस्टरवरून सलील कुलकर्णी भडकले

टीम महाराष्ट्र देशा : विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मात्र हे पोस्टर पाहून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण पोस्टरवर ”आयुष्यावर बोलु काही” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलील कुलकर्णी यांचा स्टेज शो याच नावाने गेली सोळा वर्ष रसिकांचे अविरत मनोरंजन करतो आहे. नावामुळेच हा शो पाहण्यासाठी हजारो रसिक येतात. तसेच नाती .. आई – बाबा..घर ..ह्या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांनी अनेक भावना दडलेल्या या शोच्या नावाची अशा रितीने विडंबना करणे योग्य नसल्यामुळे त्यांनी यावर निषेध जाहीर केला आहे.

नाती .. आई – बाबा..घर ..ह्या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा. " आयुष्यावर बोलू काही ‘गर्ल्स’ या अभिजात चित्रपटातील ही सुसंस्कृत व्यक्ती #familysucks and  आयुष्यावर बोलू काही असं लिहिलेला T-shirt घालून असभ्य हालचाली करते… आपल्या ह्या कार्यक्रमाबद्दल हा आदर ?? गेली सोळा वर्ष हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाचा असा अपमान ? काय विचार असेल ह्यात ? आम्ही सर्वजण सलील , संदीप खरे , आदित्य आठल्य , रितेश ओहळ मित्रमंडळी ह्याचा तीव्र निषेध करतो. अशा संतप्त भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आता मुलींच्या अनोख्या विश्वाची सफर घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात विशाल देवरूखकरांनी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ‘गर्ल्स’ या चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्रींनपैकीच एक म्हणजे ‘मती’ अर्थातच अंकिता लांडे.

अभिनयक्षेत्रात काम मिळावे एक नावाजलेली अभिनेत्री व्हावे असे स्वप्न बऱ्याच मुली बघतात आणि मुंबई नावाच्या मायानगरीत येतात. त्या सगळ्यापैकीच एक म्हणजे अंकिता लांडे. काम मिळवत असताना अंकिताने अनेक ऑडिशन्स दिल्या. योगायोग म्हणजे त्या वेळेस अंकिताने ‘बॉईज २’ साठी ऑडिशन दिली आणि तिची निवड देखील झाली. परंतु नंतर काही गोष्टी आणि अभिनयातले अधिक बारकावे अंकिताला शिकण्याची आवश्यकता आहे असे दिग्दर्शकांना वाटले. त्यांनी अंकिताला ‘बॉईज २’ चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करण्यास सांगितले. ‘बॉईज २’ चित्रपटाच्या वेळी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंकिता या संपूर्ण टीमचा भाग होती. यावेळी तिने अभिनयासोबतच चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी आत्मसात केल्या.

अभिनयाच्या वर्कशॉप मध्येही ती सहभागी झाली. जेव्हा दिग्दर्शक विशाल देवरूखकरांनी ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या कलाकारांची निवड आणि ऑडिशन सुरु केले तेव्हा, अंकिताने ‘मती’या भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. अंकिताच्या या निवड प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतात, ‘बॉईज 2’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मी आणि माझ्या टीमने मुलीच्या भन्नाट जीवनावर चित्रपट करायचे ठरवले. यावेळी अंकिता आमच्या सोबतच होती. चित्रपटाची पटकथा पूर्ण झाल्यानंतर ‘गर्ल्स’ या सिनेमासाठी कलाकारांचा शोध सुरू झाला. नवीन कलाकारांना संधी द्यायची या विचाराने नवीन मुलींसाठी आम्ही ऑडिशन्स सुरू केल्या. अनेक ऑडिशन्स झाल्या मात्र मला आणि माझ्या टीमला मनासारखी ‘मती’ मिळत नव्हती. सर्वात शेवटी अंकिताने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची ‘मती’ मिळाली.

नुकतेच या सिनेमाचे टिझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. ‘गर्ल्स’ हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच सर्वांना या सिनेमात कोण मुख्य भूमिका साकारणार याबद्दल कुतूहल होते. मात्र आता या कुतूहलाचा शेवट झाला असून ‘गर्ल्स’ चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी पहिली मुलगी ‘मती’ अर्थातच अंकिता लांडे हिचे नाव आणि चेहरा उघडकीस आले आहे.

महत्वाच्या बातम्या