सावंतवाडीत रंगणार साळगावकर विरुद्ध केसरकर असा सामना?

टीम महाराष्ट्र देशा :  शिवसेनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती राजकीय गोटातून समोर येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार थेट बबनरावांच्या संपर्कात असल्याचे समोर येत असून शिवसेनेला आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लवकरच बबनरावांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बबनराव साळगावकर आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करून केसरकर यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी स्वतः शरद पवार सावंतवाडीत येण्याची शक्यता आहे. आता हा पक्षप्रवेश केव्हा होणार याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.Loading…
Loading...