कोलकतावरुन अमरावतीत विक्रीसाठी आणला देशी कट्टा

Desi Katta Latest News

अमरावती – मूळचा पश्चिम बंगालमधील कोलकता येथील व सध्या अमरावतीत वास्तव्यास असलेला शाहरुल लश्कर-खलील लश्कर यास पोलिसांनी देशी कट्टा व ३ जिवंत काडतूससह पंचवटी चौक येथून रविवारी रात्री अटक केली होती. चौकशी दरम्यान शाहरुलने सदर कट्टा दोन महिन्यांपूर्वी विक्री करण्यासाठी अमरावतीत आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे़.

साबनपुरा येथील मशीद परिसरात राहणारा शाहरुल शहरातील एका कापड दुकानात काम करतो़ मूळचा बंगालचा रहिवाशी आहे. एक तरुण स्वत:जवळ देशी कट्टा बाळगतो व तो सध्या बाबा कॉर्नर परिसरात असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना रविवारी सायंकाळी मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने बाबा कॉर्नर गाठून शाहरुल लष्करला अटक केली़.

Loading...

झडतीदरम्यान त्याच्याजवळ देशी कट्टा व ३ जिवंत काडतूस आढळून आले होते़. देशी कट्टा कोठून व कशासाठी आणला, याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर शाहरुलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला़ अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सदर कट्टा विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली़ दोन महिन्यांपूर्वी मी विमानाने कोलकता गेलो होतो़ यावेळी बिट्टू नावाच्या मित्राने आपल्याला विक्री करण्यासाठी देशी कट्टा दिला़ हा कट्टा आपण रेल्वेने प्रवास करुन अमरावतीत आणला़ बरेच दिवस स्वत:जवळ कट्टा बाळगल्यानंतर तो विक्री करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती शाहरुलने चौकशीत पोलिसांना दिली़. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी