पगार महिन्याच्या अगोदरच संपतोय? मग हे नक्की वाचा

salary management

आधुनिक जगात माझा पगार संपतच नाही असे म्हणणारे शोधूनही सापडणार नाहीत उलट मला पगार पुरतंच नाही असे म्हणणारे लाखो सापडतील. असे का होते याच कारण शोधणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पगार पुरत नसेल तर तुम्ही तुमच्या पगारच योग्य नियोजन करत नाहीत. योग्य नियोजन नसल्याने भविष्यासाठी सेविंग सोडा उलट तुम्ही कर्जबाजारी होतात. म्हणून पगाराचे योग्य नियोजन कसे करावे त्याबद्दल जाणून घेऊयात…

तुमच्या खर्चात कपात करा : जर तुम्हाला पगार सेव करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळवावे लागेल. अनावश्यक होणारा खर्च शोधून तो कसा टाळावा याचे नियोजन करावे लागेल. हे करताना तुम्हाला थोडा त्रास होईल, पण पूर्ण पगाराच्या हिशेबाने नियोजन करणे तुम्हाला गरजेचे आहे. तरच पगार महिन्याच्या शेवटपर्यंत पुरू शकतो.

तुमच्या पगाराचे बजेट बनवा : तुमचा पगार खर्च करण्याआधीच महिन्याच्या सुरुवातीला बजेट बनवा. या बजेटला तुम्ही जरूरी खर्च, सेव्हिंग आणि एंटरटेनमेंट अशा कॅटेगिरीत विभागू शकता. यावरून तुम्हाला कळेल की, तुमचा पैसा नेमका कुठे खर्च होतोय.

कंट्रोल करायला शिका : गरज नसलेल्या वस्तूची इच्छा पूर्ण करायला गेलात तर तुम्ही नक्कीच आर्थिक संकटात सापडणार आहात. गरजा जरूर पूर्ण कराव्यात, पण आपल्या इच्छेवर नियंत्रण मिळवणेही तेवढेच गरजेचे आहे.

अडीअडचणीसाठी बचत करा : प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी दु:खाचा, मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अशा वेळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही अगोदरपासूनच तयारी ठेवली पाहिजे. म्हणून 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या मासिक खर्च पूर्ण करू शकणारा इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे. त्यासाठी सेविंग केली पाहिजे.

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा : प्रत्येकाला भविष्याची चिंता असते, गाडी-बंगला हे तर प्रत्येकाचं स्वप्न असत पण गुंतवणूक नसल्याने हे स्वप्न प्रत्येकाचं पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी दीर्घ काळासाठी एखाद्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. या माध्यमातून तुमचे पैसे अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असते.

घर खर्चासाठी रक्कम राखून ठेवा : पगारामधील 40-50% रक्कम ही घर खर्चासाठी राखून ठेवा. यामध्ये गॅस, पेट्रोल, शाळेची फी, मोबाईल बिल, घर भाडे, इंटरनेट बिल आदींचा समावेश करा. सोबतच तुम्हचा EMI, लोन, इन्शोरन्स हफ्ता असेल तर त्यासाठी वेगळं नियोजन करा.

वेळ पाळा : महिन्याच्या महिन्याला बिल भरले तर त्यासाठी जास्त रक्कम खर्च करावी लागणार नाही. यामध्ये क्रेडिट कार्ड बिल, लाईट बिल, मोबाइल बिल आदी मुदतीच्या आत भरा.