पैशाची हाव! संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाचे डोके फोडले

बीड : वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन झालेल्या वादानंतर सख्ख्या भावाचे दगडाने डोके फोडल्याची घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात शनिवारी घडली. यावरुन शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दत्ता संदीपान देशमुख (रा.समतानगर, परळी) असे जखमीचे नाव आहे. दत्ता याने भाऊ विशाल संदीपान देशमुख याला नागझरी येथील वडिलोपार्जित घर व मोहा येथील शेतीत हिस्सा मागितला. ‘मी तुला हिस्सा देणार नाही’ असे म्हणत विशालने दगडाने मारहाण केली. यात डोक्यात व डाव्या डोळ्याच्या बाजूला इजा झाली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दत्ता देशमुख यांच्या फिर्यादीवरुन विशाल देशमुखवर गुन्हा नोंद झाला.

दरम्यान अंबाजोगाईत आणखीन एक मारहाणीचा प्रकार घडला आहे. गाडीला टोपल्याचा धक्का लागल्यावरुन आईला शिवीगाळ करणाऱ्यांना समजावणाऱ्या तरुणास काठी व विटांनी मारहाण क करण्यात आली. ही घटना खापरटोन येथे रविवारी घडली. सिध्देश्वर केंद्रे याच्या फिर्यादीवरुन लहूदास केंद्रे व शिवाजी केंद्रेवर गुन्हा नोंद झाला.

महत्त्वाच्या बातम्या