शंकर कारखाना बचावासाठी न्यायालयीन लढा देणार

sugar factory

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असताना अवसायनात काढणे चुकीचे आहे. त्याची २२५ ते २५० कोटींची स्थावर मालमत्ता आहे. हा कारखाना वाचवण्यासाठी न्यायालयीन लढा देऊ. त्यासाठी बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करू, असे खासदार विजयसिंह मोहिते यांनी म्हटले. शंकर कारखान्याप्रश्नी येथील शिवरत्न बंगल्यावर आयोजित बैठकीत ते बोलत होते.

श्री शंकर कारखान्याकडे निवडणूक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने शासनाने या कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी डिसेंबर २०१६ रोजी सहा महिन्यांसाठी प्रशासक नेमेले. प्रशासकाने मुदतीत निधीची पूर्तता करून निवडणूक घ्यायला हवी होती. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे कारखाना अवसायनात काढला. सभासदांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली. सात नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्यास न्यायालयाने मुदत दिली.

Loading...

त्या पार्श्वभूमीवर हा कारखाना वाचवण्यासाठी बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. बाबाराजे देशमुख म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी स्वतःची जमीन गहाण ठेवून शंकर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला आता तो अवसायनात निघाला आहे . तो वाचवण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते यांनी पुढाकार घ्यावा. तसेच चितळेंचा खासगी साखर कारखाना ३७ लाख ५० हजार रुपयांत शंकरराव मोहिते यांनी खरेदी केला. अनंत अडचणींचा सामना करत कारखान्याने ४८ वर्षे शेतकरी, कामगारांचे हित जोपासले. व्यवस्थापनातील चुकांमुळे कारखाना अडचणीत आला. कारखाना अवसायनात निघाल्यावर घाम गाळून हातभार लावलेल्या सभासदांच्या मालकीचा राहणार नाही.

खासगी व्यक्ती विकत घेऊन सभसदांना वाऱ्यावर सोडले जाईल. सहकारमहर्षींचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी उभा केलेला हा कारखाना वाचवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.रणजितसिंह मोहिते म्हणाले, मूठभर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कारखान्याचा अपप्रचार चालवला आहे . सोलापूर सातारा जिल्ह्यातील सुमारे सात हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे. तो वाचवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. यावेळी ॲड. अभिजित कुलकर्णी, ॲड. सुरेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी २४ गावांच्या नूतन सरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते, सभापती मदनसिंह मोहिते, उपसभापती मामासाहेब पांढरे, पंढरी दाते, उपाध्यक्ष प्रकाश पाटील , मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, विलास माने, हिंदुराव माने, शशिकांत माने, दत्तात्रय भिलारे यांच्यासह कारखान्याचे सभासद, कामगार, कार्यकर्ते उपस्थित होते. न्यायालयीन लढा देण्यासाठीच्या समितीत पंढरी दाते , मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, विलास माने, दत्तात्रय रणनवरे हे असतील. त्यांच्यासोबत काम करू इच्छिणाऱ्यांनी या समितीत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार मोहिते यांनी केले. तसेच, या कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांनी ग्वाही दिली

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली