सुरक्षेच्या कारणास्तव साईबाबा मंदिरात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी

शिर्डी : शिर्डीमधील साईबाबा मंदिरात या पुढे सुरक्षेच्या कारणास्तव पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. अपप्रवृत्तींच्या पुष्पगुच्छ विक्रेत्यांना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी संस्थानकडे केली होती. हे प्रकार थांबवण्याबरोबरच सुरक्षेच्या कारणास्तव पुष्पगुच्छ नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फुले, हार व प्रसाद घेऊन जाण्यावर आधी असलेली बंदी उठवण्यात आली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.