‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूच्या बंजारा लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

रिंकू राजगुरू

मुंबई: सैराट या खेड्यातील आणि सामजिक विषमतेला फाटा देणाऱ्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या चित्रपटातून वयाच्या केवळ 21 व्या वर्षी असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे  रिंकू राजगुरू आता सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते.

नुकत्याच तिनं पोस्ट केलेल्या एका एथनिक लूकमधील फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात ती एकदम पारंपरिक अशा बंजारा पोशाखात दिसत आहे. विशेष म्हणजे हा आउटफिट खास रिंकूसाठी डिझाईन करण्यात आला आहे. संजीव राठोड यांनी तो डिझाईन केला आहे.

मरून रंगाच्या ड्रेसवर निळं आणि सोनेरी वर्क असलेला हा ड्रेस आहे. सोबतच याला खास बंजारा पद्धतीनं गोंडेही लावलेले आहेत. हा आऊटफिट घालून आपला सुरेख फोटो पोस्ट करत तिनं संजय राठोड यांचे आभारही मानले आहेत.’नेहमी, सदैव, तुम्ही केवळ तुमच्याच पद्धतीनं, तुम्हाला हवे तसेच सुंदर दिसत रहा.’ तिनं या ड्रेसला साजेसे मोजके दागिनेही यावर घातले आहेत. रिंकूच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. असे केप्शन तीन या पोस्ट ला दिले आहे.

रिंकू आता वेगानं वैविध्यपूर्ण भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून समोर येत आहे. तिनं अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या ‘अनपॉज्ड’मध्ये केलेली भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली. आता बहुचर्चित असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’मध्ये तिला पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच तिनं लंडनमध्ये ‘छूमंतर’ या चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण केलं आहे. यात ती प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी यांच्यासह दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या