पाऊले चालती पंढरीची वाटंं ! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीत आगमन

टीम महाराष्ट्र देशा : ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्त झाली आहे. तर लाखो वारकऱ्यांनी तुकारामाच्या नामघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होत आज दुपारी चारच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाला वरूणराजाने देखील हजेरी लावली. भक्तीरसात चिंब झालेली वारकरी पावसात नाहून निघाले. याच पार्श्वभूमीवर येथील भक्ती-शक्ती चौकात तुकोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक जमले होते. सालाबाद प्रमाणे पालखीचा पहिला मुक्काम हा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात असेल. आकुर्डीतील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. महापालिकेच्यावतीने पालखीतळावर वारकऱ्यांच्या विश्रांतीची सोय, तसेच भाविकांना पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी विषेश व्यवस्था करण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरीतील एचए कॉलनीत पहिली विश्रांती घेईल. दुपारच्या दरम्यान कासारवाडी येथे दुसरी विश्रांती, दुपारच्या जेवनासाठी दापोडी येथे थांबेल. आणि त्यानंतर शिवाजीनगरकडे प्रस्थान करेल.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक :

सोमवार २४ जून इनामदारवाडा

Loading...

मंगळवार २५ आकुर्डी रात्रीचा मुक्काम

बुधवार , २६ जून निवडुंग्या विठोबा, पुणे

Loading...

गुरुवार , २७ जून निवडुंग्या विठोबा

Loading...

शुक्रवार , २८ जून लोणी काळभोर

शनिवार , २९ जून यवत

रविवार , ३० जून वरवंड

सोमवार , १ जुलै उंडवळी गवळ्याची

मंगळवार , २ जुलै बारामती

बुधवार , ३ जुलै सणसर

गुरुवार , ४ जुलै निमगाव केतकी

शुक्रवार , ५ जुलै इंदापूर

शनिवार , ६ जुलै सराटी

रविवार , ०७ जुलै अकलूज

सोमवार , ०८ जुलै बोरगाव

मंगळवार , ०९ जुलै पिराची कुरोली

बुधवार , १० जुलै वाखरी तळ

गुरुवार , ११ जुलै पंढरपूर