पुण्यनगरीत आज विठूनामाचा जयघोष ; माऊलींची पालखी भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी

blank

पुणे : ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात वारकरी मंडळी पालख्यांमध्ये सहभागी होत पंढरीच्या दिशेनं रवाना होत आहेत. विठूनामाच्या जयघोषात आळंदी आणि देहूतून ज्ञानेश्वर माऊलींची आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी निघाली आहे. त्यातील मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून निघेल आणि भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महाराष्ट्रच्या विविध भागातून लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुण्यामध्ये विठूनामाचा गजर घुमणार आहे.

सबंधित बातम्या 

याही वर्षी पुण्यात पाहायला मिळणार भक्ती – शक्तीचा संगम
समर्थ बँकेचा नवीन उपक्रम भाविकांच्या सेवेत एटीम सुविधा