कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर सायनाचा थायलंड ओपनचा मार्ग मोकळा !

सायना

नवी दिल्ली : करोनामुळे जवळपास १० महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात होत आहे. थायलंडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जगातील अव्वल खेळाडू केंटो मोमोटा करोनाग्रस्त आढळून आल्याने जपानने अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. व तिला हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते. थायलंड ओपन २०२१ या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला होता. सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली होती.

तसेच केवळ सायनाचाच नाही तर भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर सायनाचा पती आणि बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप याला देखील क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. या दोघांनाही बँकॉक येथील स्थानिक रुग्णालयात पुढील चाचणी आणि उपचारासाठी घेऊन जाण्यात आल्यान्नात्र तेथे त्यांचा एंटीबॉडी चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी सायनाचा करोना रिपोर्ट् पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तिला उद्यापासून स्पर्धेत सहभागी होता येईल असे सांगितले.

‘कोरोनामुळे ज्या खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे तसेच क्वारंटाइन असल्यामुळे खेळता येणार नव्हते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना सकाळीच थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात आल्याचे जाहीर झाले होते. मात्र खेळाडू कोरोना निगेटिव्ह असल्याचे जाहीर झाल्यानंतर पहिल्या फेरीचे वॉकओव्हर थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्याचा निर्णय रद्द झाले आणि आज पासून पहिल्या फेरीचे सामने होतील असे जाहीर करण्यात आले. यामुळे सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एचएस प्रणॉय यांचे पहिल्या फेरीचे सामने बुधवारी होतील आणि त्यातील विजेत्यालाच दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळेल.

महत्वाच्या बातम्या