फुलराणी भाजपात ; बॅडमिंटन कोर्टमधून आता थेट राजकारणाच्या मैदानात

टीम महाराष्ट्र देशा- भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने भाजपात प्रवेश केला आहे. सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

Loading...

सायनाचा भाजप प्रवेश हा सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या सायना नेहवालने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. भाजपा कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. सायना नेहवालच्या आधी अनेक खेळाडूंनी भाजपात प्रवेश केला आहे. पैलवान योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे.

सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. तिने दोन्ही स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...