भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अडकणार विवाहबंधनात

टीम महाराष्ट्र देशा- भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या वर्षाखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जगापासून लपून प्रेमात अखंड बुडलेल्या या जोडप्याने अखेर लग्नाचा मुहूर्त ठरवला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप १६ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेती सायना आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पारुपल्ली कश्यप यांच्यातील नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. प्रशिक्षक गोपीचंद यांचे दोघेही शिष्य. काही दिवसांपूर्वी सायनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. या दोन्ही खेळाडूंच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

कौटंबिक आणि मोजक्याच जवळील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवहसोहळा पार पडणार आहे. त्यामध्ये फक्त १०० लोकांचा सहभाग असेल. लग्नानंतर पाच दिवसांनी २१ डिसेंबर रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मित्र-मंडळी, क्रीडा आणि चित्रपट जगातातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे.