कांस्यपदक जिंकल्यावर सायनाने सिंधुचे अभिनंदन न केल्याने सोशल मीडीयावर चर्चांना उधान

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी समिश्र कामगीरी केली आहे. शंभरावर भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेत भारताच्या नावे अद्याप केवळ २ पदकाची कमाई आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही पदक महिला खेळाडूंनी पटकावले आहे.

भारतीय स्टार बॅडमींटनपटु पी व्ही सिंधुने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारताच्या खात्यात दुसरे पदक टाकले. यासह सलग दोन ऑलिम्पीक पदक पटकावणारी सिंधु पहिली भारतीय खेळाडू ठरली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेक क्रीडापटु आणि सेलिब्रीटीनी सिंधुचे भरभरुन कौतुक केले आहे. मात्र भारताची माजी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अद्यापही तिचे अभिनंदन केले नाही. यामुळे सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधु दोघीत काहीतरी अलबेल आहे अशा चर्चा सोशल मीडीयावर सुरु आहे.

या प्रकणावर बोलताना सिंधु म्हणाली की आम्ही जास्त बोलत नाही. मात्र हे का त्याचा मात्र खुलासा सिंधुने केला नाही. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सायना नेहवाल पात्रता फेरी पार न करु शकल्याने सहभागी नाही होऊ शकली. यापुर्वी २०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्य पदक पटकावले होते. यानंतर पीव्ही सिंधूने २०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि आता टोकीयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं. लागोपाठ तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमधून मेडल मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या