Sara Ali Khan- सारा शिक्षणावर लक्ष देणार!

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची कन्या सारा खान सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. इतर स्टार-कीड प्रमाणे बी-टाऊनमध्ये दमदार इंट्री करण्याचा तिचाही प्रयत्न आहे. या तिच्या निर्णयाला खुद्द तिचे वडील सैफचा नकार आहे, नुकतेच त्याने एका ट्विटमधून साराने तिथेच थांबून शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे असा सल्ला दिला आहे.

तर दुसरीकडे सारालाही ‘स्टुडन्ट ऑफ द इयर -2’ या चित्रपटामार्फत आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात करायची संधी मिळाली होती. परंतु आई अमृता सिंगच्या नकारामुळे तिने हा चित्रपट नाकारला. स्टार-कीड आपल्या आई-वडिलांच्या जीवावर करिअर करतात असा एक समज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. पण या समजुतीला अमृता सिंगने पूर्णपणे खोटं ठरवलं आहे.

You might also like
Comments
Loading...