Share

Breaking News | साईबाबा यांची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने नाकारली ; फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आल्याचे भाजपचे ट्वीट

मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा (G.N.Saibaba) यांच्यासह सहा आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबरला होणार आहे.

देशद्रोह आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची सुटका करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सविस्तर माहिती दिली. सुनावणी आवश्यक आहे. त्यामुळे साईबाबा तुरुंगातच राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आलं असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. अशा आशयाचं ट्विट देखील भाजपकडून करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा (G.N.Saibaba) यांच्यासह सहा आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now