राजकीय टीकेसाठी शिर्डीचा वापर केल्यानं राहुल गांधींवर साईबाबा संस्थान ट्रस्ट नाराज

Rahul-Gandhi

टीम महाराष्ट्र देशा: रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डीचा वापर केल्याने साईबाबा संस्थान ट्रस्ट ने नाराजी व्यक्त केली आहे. साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी याप्रकरणी राहुल गांधी यांना चांगलंच झापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीला ओढणे अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत साईबाबांच्या भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली असून तुम्ही साईभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी ट्विट करून केली आहे.

सुरेश हावरे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात, राहुलजी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीला खेचणे खूप दुर्दैवी आहे. यामुळे देश-विदेशातील साईभक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे. सर्व भक्तांच्या वतीने मी तुमचा निषेध करतो. या अपमानासाठी तुम्ही साई भक्तांची माफी मागितली पाहिजे.

राहुल गांधी यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, मित्रों, शिर्डीतील चमत्कारांना कोणतीही मर्यादा नाही, असे म्हणत त्यांनी #PiyushGhotalaReturns असे लिहिले होते.