साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड

शिर्डी

शिर्डी : साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. तर उपाध्यक्षपती अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ लवकरच जाहीर होणार हे निश्चित होतं. त्यावेळी नव्या विश्वस्त मंडळाची यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरु लागली होती. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळात कोण-कोण?

आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष, अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष, अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य, सुहास जनार्दन अहेर – सदस्य,अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य, सचिन रंगराव गुजर – सदस्य, राहुल कनाल – सदस्य, सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य, जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य, महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य, एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य, सभापती, शिर्डी नगर पंचायत यांची वर्णी लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या