मुंबई : मराठीमध्ये अनेक उत्तम दर्जाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाइमपास ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागाला लोकांनी खूप प्रेम दिले. यामुळे याचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील एक धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं आहे.
‘टाइमपास ३’ मधील ‘साई तुझं लेकरू’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. मागच्या दोन भागांमध्येच आपण पाहिलं की दगडू साईबाबांचा खूप मोठा भक्त आहे. या गाण्यामध्ये भाऊ कदम यांची झलक देखील पाहायला मिळत आहे. दगडू म्हणजे प्रथमेश परब याने या गाण्यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
आरती वडगबाळकर, मनमित पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण या कलाकारांची या गाण्यामध्ये झलक पाहायला मिळत आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणं लिहिले आहे. ‘टाइमपास ३’ हा चित्रपट २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<