सई ताम्हणकरने दुख-या पायासह केले रिएलिटी शोसाठी शूटिंग

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून फिल्मइंडस्ट्रीने शुटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे महाराष्ट्राची हास्यजत्रा या आपल्या कॉमेडी रिएलिटी शोच्या निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पायाला दुखापत झाली असतानाही अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच शुटिंग केले.

मीमी ह्या बॉलीवूड चित्रपटाचे शुटिंग करत असताना सईच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला डॉक्टरांनी एक महिना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. सई गेले काही दिवस आपले सर्व कार्यक्रम रद्द करून घरी विश्रांती घेत होती.

मात्र काही दिवस सर्वच मालिका चित्रपटांचे चित्रीकरण रद्द होणार असल्याने, सईने दुखण्यातही चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्लॅस्टर असलेल्या पायासह तिने चित्रीकरण पूर्ण केल्याचे ह्या चित्रीकरणादरम्यान तिने केलेल्या फोटोशूटवरून दिसून येत आहे.