वाढदिवस विशेष : सई ताम्हणकर- मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल गर्ल सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. सईचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. सईने अनेक चित्रपटातून वर्सेटाईल भूमिका केल्या. मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

सई ताम्हणकर हे नाव मराठी चित्रपट सृष्टीत माहित नाही असा सिनेरसिक शोधूनही सापडणार नाही . बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखली जाते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. पण त्यापूर्वी सईने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.

‘सनई चौघडे’ हा सईचा पहिला चित्रपट. मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ख्याती काही नवीन नाही. ती तिच्या ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’. या चित्रपटामुळेच. यातील बिकिनी सीनमुळेच सई बरीच चर्चेत आली. इतर अभिनेत्रींपेक्षा सई नेहमीच चर्चेत असते ती आपल्या बिंधास्त लाईफ स्टाईल आणि अप्रतिम अभिनयामुळे.