मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आगामी चित्रपट पर्वम हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने हा वाद सुरु झाला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर पोलीस तक्रारही दाखल झाली आहे. आता साईने तिची बाजू मांडत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
साई पल्लवीचे स्पष्टीकरण –
साई पल्लवी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण देत म्हणाली, “ही पहिलीच वेळ आहे की मी तुमच्या सर्वांसोबत संवाद साधत आहे. मी नेहमीच माझ्या मनात ज्या गोष्टी असतील त्या बोलून दाखवते. मी माझे मत मांडण्यास उशीर केला आहे त्याबद्दल मला माफ करा. माझे मत चुकीच्या पद्धतीने समोर ठेवण्यात आले. मी एवढेच सांगिले की धर्माच्या नावाने कोणताही वाद चुकीचा आहे. मला स्वतःलाच शॉक बसला मी जे बोललं ते चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि तेच मांडलं गेलं”.
या वक्तव्यामुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात –
”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<