माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी माहिती घेवून चिंतन करावं; सुभाष देशमुख 

पुणे : सोलापूरमध्ये नव्याने होवू घातलेल्या एका वस्त्रोद्योग प्रकल्पास प्रत्यक्ष त्या खात्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांच्याच लोकमंगल समूहातील ‘लोकमंगल डेव्हलपर्स’ या संस्थेची जागा भाडेकराराने दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यावरून देशमुख हे आपल्याला व्यावसायिक फायदा होण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. दरम्यान आज सुभाष देशमुख यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांच खंडन केल आहे.

आपल्या मतदारसंघातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधींच काम आहे. आणि त्याच भावनेतून मी माझ्या मतदार संघातील महिलांना रोजगार मिळण्यासाठी संबंधित जागा दिली असून माझ्या हातातून चुकीचं काम होणार नाही. जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी आधी संबंधित प्रकरणाची सर्व माहिती घ्यावी आणि चिंतन करावं अस म्हणत सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांच खंडन केल आहे.