अखेर नवाजुद्दिन सिद्द्कीच साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका; सिनेमाचा ट्रीझर लॉच

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘ ठाकरे’ या सिनेमाच आज मोठ्या दिमाखात ट्रीझर लौंच करण्यात आल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या सिनेमात नवाजुद्दिन सिद्दिकी हाच बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची पटकथा असलेल्या या सिनेमाच दिग्दर्शन अभिजित पानसे हे करणार आहेत. याच लेखन करण्यासाठी तब्बल चार वर्षे लागली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार यावर बऱ्याच चर्चा होत होत्या. आधी अक्षय कुमार, अजय देवगन याचंही नाव भुमिकेसाठी चर्चेत आले होते. अखेर नवाजुद्दिन सिद्दिकी याचा नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.