fbpx

साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत- जयंत पाटील

jayant patil

पुणे: राज्यकर्त्यांची कातडी गेंड्याची आहे. सरकारच्या दारावर जाऊन शेतकरी आत्महत्या करतो, मात्र ह्या लोकांच्या डोळ्यात पाणी दिसत नाही. आमचं राज्य बहुजन समाजाचं आहे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य. मात्र, दुर्दैवाने मागील काही काळापासून लोकांना हे राज्य आपलंसं वाटेना. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली

तसेच अजित पवार यांनी नवीन नेतृत्वाला संधी देण्याची भावना व्यक्त केली होती. त्यावर बोलतांना
‘साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत’ असे जयंत पाटील म्हणाले.

पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं , यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची एकमुखाने घोषणा करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले, सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली.

जयंत पाटील म्हणाले, दुसरी राज्य पूढे जात असताना महाराष्ट्राचा विकास टकमक टोकावर आहे. गाव खेड्यांसह शहरात देखील लोक महागाईने त्रस्त, शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून आम्ही अनेकवेळा रस्त्यावर उतरलो. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना सोबत घेत संघर्ष केला. राज्य प्रगतीकडे जण गरजेचं असताना अधोगतिकडे निघाले आहे. आजच्या राज्यकर्त्यांची शेती माती आणि संस्कृतीची नाळ तुटली आहे. असेही ते म्हणाले.

अजित दादांवर बोलतांना जयंत पाटील म्हणाले , दादांशी वागणे म्हणजे पेशन्स लागतात. कधी चिडतील आणि कधी शांत होतील सांगता येत नाही. मागे पुढे फिरणार्यापेक्षा जनतेत फिरणाऱ्यांना स्थान देण्यासाठी मी काम करेल , मला माहित आहे हे सोपं नाही पण यासाठी मी प्रयत्न करणार. परफॉर्मन्स काऊंट झाला तर त्याला पक्षात काहीही धोका नाही. पक्ष उभा करण्यासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गट तट नाहीत ,आम्ही सगळे शरद पवार या आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे विध्यार्थी आहोत. माझा पायगुण बरा आहे दादा, असे पाटील म्हणाले