अॅम्बी व्हॅली जप्त करा- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : पुण्यातील सहारा समुहाची अॅम्बी व्हॅली ही टाऊनशीप जप्त करण्यात यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

अॅम्बी व्हॅली ही पुण्यामध्ये (लोणावळ्याजवळ) सहारा समुहाने विकसीत केली आहे. सहारा समुहाच्या ज्या मालमत्ता कर्जासाठी गहाण ठेवलेल्या नाहीत, त्याची यादी 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

11 हजार कोटींची थकबाकी भरली असून, उर्वरीत थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी जुलै 2019 पर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे.

You might also like
Comments
Loading...