सफारी पार्कला मिळणार ‘ऐतिहासिक लुक’

औरंगाबाद : मिटमिटा येथील शंभर एकर जमिनीवर सफारी पार्क उभारले जाणार आहे. या संपूर्ण परिसराला एखाद्या किल्ल्यासारखा लूक दिला जाणार असल्याने याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ होत आहे. किल्ल्याच्या दरवाज्याप्रमाणे प्रतिकृती असणारे सफारी पार्कचे प्रवेशद्वार असेल. पर्यटकांना प्राण्यांना पाहण्यासाठी बुरूज बांधले जाणार आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीच्या निधीतून पडेगाव परिसरातील मिटमिटा येथील माळरानावर सफारी पार्क प्रकल्प राबवला जाणार आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने या कामासाठी १४७ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. सफारी पार्कचे प्रवेशद्वार हे किल्ल्यासारखे दगडी बांधकामासारखे करत दरवाजा उभारण्यात यावा, त्यासोबतच सफारी पार्कमधील प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी पर्यटकांसाठी बुरूज बांधण्यात यावे, त्यामुळे पर्यटकांची आणि प्राण्यांची नजरानजर होणार नाही. बुरूजामधून प्राण्यांचे जवळून निरीक्षक करता येईल, अशा सूचना आयुक्त पांडेय यांनी केल्या आहेत.

आयुक्तांच्या सूचनेला पीएमसीची मान्यता
सफारी पार्कला एखाद्या किल्ल्यासारखा लूक असावा या आयुक्तांच्या सूचनेला पीएमसीचे शर्मा यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात या कामांचा समावेश केला जाणार असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या