अहमदनगरच्या गुन्हेगारी घटनांमुळे व्यथित- अण्णा हजारे

राळेगणसिद्धी / स्वप्नील भालेराव : जिथे साईबाबांची पवित्र समाधी आहे, जगभरातून जिथे लोक दर्शनासाठी येतात, ज्या भूमित जगाला विश्व बंधुत्त्वाचा संदेश देणारी ज्ञानेश्वरी लिहिली गेली, जिथे सेनापती बापटांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी योगदान दिले त्या नगरची आजची अवस्था पाहून अतिशय दुःख होते.

राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नगरचे नाव बदनाम होताना पाहून वाईट वाटतेय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्या नशेत लोकांना सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोनाचा विसर पडल्यामुळेच अशा घटना वारंवार घडताहेत. अलिकडच्या काळातील नगरमधील घटना ह्या समाजासाठी अत्यंत धोकादायक आहेत.

गेल्या काही वर्षात नगरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जे वाढत आहे .त्याच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. नेमके काय कारण आहे? कायदा व सुव्यवस्था कमी पडतेय का? वाढत्या गुन्हेगारीला नेमके कोण जबाबदार आहे? ह्या सर्व गोष्टींचा शोध घेणे आवश्यक आहे. अशी अस्वस्थता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

You might also like
Comments
Loading...