निवडणूक जिंकूत नाही तोपर्यंत गळ्यात फुलांचा हार घालणार नाही : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Loading...

दरम्यान, या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना साध्वी मात्र बिनधास्त असल्याचे चित्र आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सिहोर येथील गणेश मंदिर जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकून येणार आहे, तो पर्यंत गळ्यात फुलांचा हार घालणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.Loading…


Loading…

Loading...