fbpx

मैने कहा था तेरा सर्वनाश होगा ; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या त्या चांगल्याच चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

मध्यप्रदेशातील भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले तसेच हेमंत करकरे यांनी साध्वीला सोडणार नाही असे म्हटले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर ?

वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा. ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए. मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ.