सोनिया गांधी म्हणजे ‘इटलीवाली बाई’, साध्वी प्रज्ञाचा कॉंग्रेसवर निशाना

सुरत: देशाच्या सत्तेत एक महिला असताना अनेक संताना तुरुंगात राहून यातना सहन कराव्या लागल्या, याला कारण ती महिला इटलीतून आलेली होती म्हणत साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सध्या जामिनावर बाहेर आहे. आज त्यांनी सुरतमध्ये रोड शो करत सोनिया गांधी आणि कॉंग्रेसवर निशाना साधला.

कोणत्याही कारणाशिवाय हिंदू धार्मिक नेत्यांना तुरुंगात ठेवल जात आहे, तसेच कॉंग्रेसकडून केल्या जाणाऱ्या विभाजन विचारसरणी विरोधात देशभर फिरून उभं राहणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितल. साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या भाषणात अनेकदा इटलीतून आलेल्या बाईचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे सोनिया गांधी यांच्यावर निशाना साधला.

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, त्यांनी कथुआ बलात्कार प्रकरणावरही वादग्रस्त विधान केलं आहे.

You might also like
Comments
Loading...