सदाभाऊंच्या रयतला धक्का, प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांचा राजीनामा

कोल्हापूर : नव्या मराठा क्रांती संघटनेची स्थापना करत रयतच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुरेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. पाटील यांचा राजीनामा सदाभाऊ खोत यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सदाभाऊंच्या रयतचा आक्रमक चेहरा म्हणून सुरेश पाटील यांची ओळख होती.

आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये या नव्या संघटनेची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे.राज्यातील 20 संघटना एकत्र येऊन नव्या संघटनेची स्थापना करणार येणार असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 9 जुलै आणि 9 ऑगस्टला मराठा क्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचा माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे. 9 ऑगस्टला क्रांती संघटनांकडून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या 15 हून अधिक संघटना या क्रांती संघटनेमध्ये सहभागी झाल्या असून या संघटनेच्या कार्यकारिणीची घोषणाही आज कोल्हापूरमध्ये करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...