fbpx

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांचा राज्य सरकारच्या अध्यादेशातही खोडा

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते वैद्यकीय पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहेत. सदावर्ते यांनी यासंबंधी राज्यपालांना पत्रदेखील पाठवले आहे. कलम २१३ च्या अधिकाराचा वापर करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारात घ्यावा, असे त्या पत्रात नमूद केले आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण सुधारित अध्यादेश जारी करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी अद्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी म्हंटले होते. याचदरम्यान, गुणरत्न सदावर्ते आता या अध्यादेशाला आव्हान देणार आहेत.

सदावर्ते यांनी यासंबंधी राज्यपालांना पत्रदेखील पाठवले आहे. या अध्यादेशावर स्वाक्षरी करु नये आणि पुनर्विचारासाठी हा निर्णय राज्य सरकारकडे परत पाठवावा. इतकेच नव्हे तर, कलम २१३ च्या अधिकाराचा वापर करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारात घ्यावा. असे सदावर्ते यांनी त्या पत्रात म्हंटले आहे.