दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो, शिवसेनच्या खासदाराचा पलटवार

shivsena - bjp

अहमदनगर-आज दूध उत्पादक राज्यभर पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. २० जुलैपासुन महायुतीसह अनेक शेतकरी संघटनांनी दुधाच्या भावासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर, काही दिवसांची मुदत देत सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा बडगा उगारला आहे.

माजी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली.

“आजचं आंदोलन महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत” असं राम शिंदे म्हणाले.

‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे.

दूध दराच्या प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘दूध उत्पादक व्याकूळ झाले आहेत ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं व राज्य सरकारनंही निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिलं पाहिजे, अशी खासदार म्हणून माझीही भूमिका असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’

राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत – देवेंद्र फडणवीस