उस दर म्हणजे रतन खत्रीचा आकडा नाही; कधीकाळी दरासाठी रान उठवणाऱ्या सदाभाऊंचे शब्द बदलले

टीम महाराष्ट्र देशा: कधीकाळी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी सरकारला उसाच्या टिपऱ्याने धुवून काढणारे शेतकरी नेते आणि सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ याचं एक धक्कादायक विधान आले आहे. उस दर आधीच जाहीर करायला काही रतन खात्रीचा आकडा नाही. म्हणत त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर निशाना साधला आहे. तर दर ठरवण्याचा अधिकार केंद्र किंव्हा राज्य सरकारला नसून सी रंगराजन समितीने ठरवलेल्या ७०-३० च्या फॉर्म्युलानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे.

bagdure

प्रत्येक वर्षी हंगामात शेतकरी संघटनेचे नेते ऊस दर जाहीर करतात आणि सरकारनेही तोच दर द्यावा यासाठी आंदोलने केली जातात. मात्र ऊसाचा दर सरकार ठरवूच शकत नाही त्यामुळे शेतकरी आंदोलने व्यर्थ होता असल्याच खोत यांनी सांगितल आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित राज्य मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...