आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरतं मागं घेतोय- सदाभाऊ खोत

आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरतं मागं घेतोय- सदाभाऊ खोत

Sadabhau Khot

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांच्या (st bus workers)पगारवाढीची (salary increased) घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी या आंदोलनाची पुढची भूमिका सांगितली आहे.

एसटी कर्मचारी आंदोलन हे कर्मचाऱ्यांनी सुरु केलं होतं आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. गेल्या अनेक वर्षांची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती की, शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने पगार दिला पाहिजे. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोग आम्हालाही लागू केला पाहिजे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. सरकारने याकडे डोळेझाक केल्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झाला. मग विलीनीकरण झालं तरंच आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने पगार मिळू शकतो, ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे हे कामगार एकत्र येऊन आंदोलन पुकारलं, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

एस.टी. कर्मचारी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये फूट पडलेली स्पष्ट दिसते आहे. कारण, भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे, असंही सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

15 दिवसांनंतर सरकारला जाग आली आणि चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेमध्ये एका बाजूला विलीनीकरणाची न्यायालयीन लढाई सुरु आहे. तोपर्यंत निर्णय येईपर्यंत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आज खऱ्या अर्थाने कामगारांच्या लढ्याचा पहिला टप्पा पार झाला आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. हा कामगारांचा मोठा विजय आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या