मुंबई : अनाथांसाठी जीवन अर्पण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Saplak) यांचे पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही सिंधुताई यांच्या निधनाने शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी एक फोटो पोस्ट करत भावनिक ट्विट केले आहे. सदाभाऊ म्हणतात, ‘अमाप माया सोबत घेऊनी, माय चालली अनाथ करुनी!, सिंधुताई सपकाळ यांच्या भेटीसमयीचा हा एक प्रेमळ क्षण. आमच्या आयुष्यभर पुरेल एवढा हृद्य आहे. माई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या जाण्याने शोकाकुल आहे. पुन्हा माय बनून या. भावपूर्ण श्रद्धांजली माई..!!’, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
*अमाप माया सोबत घेऊनी*
*माय चालली अनाथ करुनी!*सिंधुताई सपकाळ ह्यांच्या भेटी समयीचा हा एक प्रेमळ क्षण. आमच्या आयुष्यभर पुरेल एवढा हृद्य आहे.
*माई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या जाण्याने शोकाकुल आहे. पुन्हा माय बनून या.*
*भावपूर्ण श्रद्धांजली माई..!!*💐💐 pic.twitter.com/uhHDgCrdRe
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 5, 2022
बुधवारी सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. १२ वाजता पुण्यात ठोसर पागेत दफनविधी करण्यात येईल. महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने दफनविधी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं- पंतप्रधान मोदी
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<