सदाभाऊनी केला राजू शेट्टींचा हिशोब चुकता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन दिग्ग्ज नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये सुरू असलेल्या शीत युद्धाचा आणखी एक भाग समोर आला आहे.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वडील आजारी असताना राजू शेट्टी यांच्याकडून घेतलेले अडीच लाख रुपये त्यांना परत केले आहेत .
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी वडिलांच्या आजरपणात मदत केल्याचं खोत यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना मदत म्हणून दिलेल्या पैशांची स्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती . एकप्रकारे राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना केलेल्या मदतीची आठवण करून देत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आलं. मात्र आता या प्रकाराला जशास तसं उत्तर म्हणून सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने राजू शेट्टींना परत केलेल्या रकमेची स्लीप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे .त्यामुळे सदाभाऊंनी राजू शेट्टींचा हिशोब चुकता केला अशी चर्चा रंगू लागली आहे.

recipt of money from sadabhau khot to raju shett