सोलापूर : सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यासोबत एक अजब प्रकार घडला. सांगोला तालुक्यातील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी “आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा”, असे म्हणत सदाभाऊंच्या गाडीचा ताफा अडवला.
सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. आता यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळत हा राष्ट्रवादीचा कट असल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून त्यांना धोका असल्याचे आरोप त्यांनी केलेत. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात ‘आरे ला कारे’ म्हणूनच उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या –