वा रे वा…गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात आणि मुख्यमंत्री थेट पंढरपुरात – सदाभाऊ खोत

sadabhau khot

मुंबई : यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने आषाढी पायी वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली. यामुळे अनेक वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मानाच्या १० पालख्या काल शिवशाही बसने पंढरपुरात दाखल झाल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील स्वतः गाडी चालवत कालच पंढरपूरला आले.

आज आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय पूजा मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या पत्नी आणि मानाच्या वारकरी जोडप्याकडून पार पडली आहे. तर, दुसरीकडे बंडातात्या कराडकर हे मात्र पायी वारी करण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांना चकवा देऊन गनिमी काव्याने बंडातात्या कराडकर हे पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलिसांना सतर्क करण्यात आले होते.

दरम्यान, यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ‘विठू माझा लेकरूवाळा, संगे गोपाळाचा मेळा.गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यासाठी थेट पंढरपूरात…वा रे …वा अजब तुझे सरकार…!,’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP